logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चिखलीचे कलाशिक्षक यशवंत खाकरे यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श कलाशिक्षक’ पुरस्काराने सन्मान


शिवाजी विद्यालयाच्या खाकरे यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव

-चिखली. दि. २८ मार्च – महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे यांच्यातर्फे आयोजित 44व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद राजधानी सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात दि. २८ व २९एप्रिल २०२६ ला पार पडली या कलाशिक्षण परिषदेत राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शिवाजी विद्यालय, चिखली, जि. बुलडाणा येथील कलाशिक्षक यशवंत खाकरे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देवुन त्यांचा गौरव करण्यात आला.

गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, हस्तकला व नाट्य या विविध कला प्रकारांमध्ये संस्कार देणाऱ्या खाकरे सरांच्या कार्याची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. विद्यालयातील कला शिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक चित्रप्रदर्शने आणि समाजोपयोगी भिंतीचित्रांनीही त्यांची ओळख निर्माण केली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बारई उपस्थित होते. त्यांच्या हस्ते खाकरे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बारई यांनी उद्गार काढले की, “कलाशिक्षक हाच खऱ्या अर्थाने समृद्ध संस्कृतीचा शिल्पकार असतो. यशवंत खाकरे यांनी चिखलीसारख्या छोट्या गावातून उत्तम कलाप्रतिभा निर्माण करून आदर्श घालून दिला आहे.”

यावेळी बुलडाणा जिल्हा कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष संजय काकडे तसेच प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ कला शिक्षक रवींद्र खानंदे, अनिल गवई, गणेश अभोरे, राम जाधव यांनीही खाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच बुलढाणा जिल्हा कलाध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यांनी खाकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. “खाकरे सरांचा हा पुरस्कार संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे,” अशा शब्दांत बुलढाणा जिल्ह्यातील कलाशिक्षकांनी व्यक्त केला.

या कला शिक्षण परिषदेसाठी राज्यभरातील सुमारे आठशे हून अधिक कलाशिक्षक व कलाप्रेमी सहभागी झाले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कलेतील नवे प्रवाह आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती यावर या शिक्षण परिषदेत चर्चा झाली.

पुरस्कार मिळाल्यानंतर भावुक झालेले यशवंत खाकरे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा सन्मान आहे. शिवाजी विद्यालयाच्या व्यवस्थापनाने व मुख्याध्यापकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले. पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कलेचे संस्कार देण्याचा संकल्प करतो.”

13
1211 views

Comment