अल्पवयीन मुलीला पळविले
जळगाव : रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेले. ही घटना २८ मार्च रोजी उघडकीस आली. मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक भूषण कोते करीत आहेत