logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अश्रूंनी निरोप; पत्रकार योगेश महाजन यांची अंत्ययात्रा शोकाकुल वातावरणात पार पडली

अश्रूंनी निरोप; पत्रकार योगेश महाजन यांची अंत्ययात्रा शोकाकुल वातावरणात पार पडली

दै. ग्लोबल महातेजचे मुख्य उपसंपादक योगेश महाजन यांना अखेरचा निरोप; मान्यवरांची मोठी उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील वाघ बिल्डिंगमधील रहिवासी तथा दै. ग्लोबल महातेजचे मुख्य उपसंपादक योगेश अशोक महाजन (वय ४७) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबियांसह संपूर्ण अमळनेर शहर व पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता त्रिकोणी बगीच्या जवळील वाघ बिल्डिंग येथील राहत्या घरापासून निघून शोकाकुल वातावरणात पार पडली.

योगेश महाजन हे अशोक बाजीराव महाजन यांचे जेष्ठ चिरंजीव, सुशील व अमित महाजन यांचे जेष्ठ बंधू तर वेदांत महाजन यांचे वडील होत. कुटुंबातील आधारस्तंभ असलेले योगेशजी यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. सन २००२ मध्ये दै. सकाळमध्ये ऑपरेटर म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. त्यांच्या प्रामाणिक कामगिरीमुळे त्यांना पुढे अमळनेर विभागीय कार्यालय प्रमुख तथा उपसंपादक म्हणून जबाबदारी देण्यात आली. सध्या ते दै. ग्लोबल महातेजमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत होते.

मितभाषी, संयमी व सर्वांची आपुलकीने विचारपूस करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सहकाऱ्यांमध्ये ते अत्यंत आदरणीय होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रातील एक प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत “पत्रकारिता क्षेत्रातील हिरा गमावला असून अत्यंत मितभाषी, सज्जन व जिव्हाळ्याचा पत्रकार हरपल्याचे दुःख आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यचिटणीस डॉ. डिगंबर महाले तसेच जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व क्षत्रिय फुलमाळी समाज पंचमंडळ अध्यक्ष व विश्वस्त मंडळ व समाज बांधव, पत्रकार संघटना अमळनेर
इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. “पत्रकारिता क्षेत्रातील एक निष्ठावान आवाज हरपला आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त करत महाजन कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना केली.
पत्रकार योगेश महाजन यांच्या स्मृतींना दैनिक महाराष्ट्र सारथी मुख्य संपादक संदीप पाटील व कार्यकारी संपादक, उपसंपादक
व अमळनेर तालुका प्रतिनिधी ईश्वर महाजन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0
0 views

Comment