पुणे : सोने-चांदी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून ११ कोटींहून अधिक रक्कम घेऊन ठरलेल्या मुदतीत माल न देता फसवणूक केल्याप्रकरणी रविवार पेठेतील गुन्हा दाखल
पुणे : सोने-चांदी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून ११ कोटींहून
अधिक रक्कम घेऊन ठरलेल्या मुदतीत माल न देता फसवणूक केल्याप्रकरणी रविवार पेठेतील ज्वेलर्सविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज गौतमचंद कोरीमुथा, नेमीचंद कोरीमुथा आणि आशिष नेमीचंद कोरीमुथा (सर्व रा. शांतीनगर सोसायटी, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण नामदेव जाधव (वय ४१, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रविवार पेठेतील 'नवकार प्लस ज्वेलर्स' आणि 'नवकार ज्वेलर्स' या फर्मचे मालक आहेत. सोने-चांदी खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या नावाखाली त्यांनी फिर्यादींकडून कोटक महिंद्रा बँक, कोरेगाव पार्क शाखेतील खात्यावर आरटीजीएसद्वारे ११ कोटी ४२ लाख ८४ हजार ६०० रुपये जमा करून घेतले.