logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जि. प. प्रा. शाळा भरणे बाईतवाडी शाळेतील विद्यार्थी कु. प्रतिक गजानन चव्हाण याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षांमध्ये झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरणे बाईतवाडी या शाळेतील विद्यार्थी कुमार प्रतीक गजानन चव्हाण इयत्ता पाचवी याने उत्तम गुण मिळवून जवाहर नवोदय विद्यालयात दिमाखात प्रवेश मिळविला आहे.जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल त्याला उत्तम मार्गदर्शन केलेल्या प्रतिकच्या वर्गशिक्षिका सौ सुप्रिया चाळके मॅडम,मुख्याध्यापिका श्रीम . गेजगे मॅडम,माजी मुख्याध्यापक श्री देवेंद्र शिर्के सर , प्रतीकचे आई वडील यांनी विशेष कौतुक केले तसेच व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा सौ.रुपाली घडशी, उपाध्यक्षा सौ.दीक्षा घडशी,सदस्य श्री संजय मोडसिंग सर पालक आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने कुमार प्रतिक गजानन चव्हाण याचा सत्कार करण्यात आला तसेच केंद्रप्रमुख श्री चौरे सर त्याचप्रमाणे गटशिक्षण अधिकारी श्री बाईत सर यांचे व्हिजन प्रभाग खेड अंतर्गत केलेले मार्गदर्शन शिक्षक व प्रतिक साठी मोलाचे ठरले.शाळेच्या वतीने सर्व शिक्षकवृंद पालक वर्ग तसेच व्यवस्थापन कमिटी तसेच वर्गातील व शाळेतील विद्यार्थी यांनी प्रतिकचे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

0
1129 views
1 shares

Comment