logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मेडल प्राप्त सैनिकाच्या पालक,पत्नीस रेल्वे आजीवन मोफत


भारत सरकारची मोठी घोषणा ! सैन्यात मेडल
अथवा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीच्या पत्नी किंवा आई वडिलांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास
सैन्यात मेडल अथवा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला रेल्वे प्रवासात काही श्रेणीत मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून रेल्वेला याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या आधीपर्यंत रेल्वे प्रवासात अनेक श्रेणींमध्ये सवलती किंवा सूट मिळत होती पण त्यानंतर ते मर्यादित करण्यात आले.
भारत सरकारने एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, लष्कर, नौदल, वायुसेनेच्या शौर्य पदकाचे मानकरी आणि त्यांच्या जोडीदारांना (विधुरांना त्यांच्या पुनर्विवाहापर्यंत) एका सहप्रवाशासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आयुष्यभर
मोफत प्रवास करण्याचा हक्क असेल. ज्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे आणि त्यावेळी ते अविवाहित होते त्यांच्या पालकांना एका सहप्रवाशासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आयुष्यभर मोफत प्रवास करण्याचा हक्क असेल.
याचा लाभ फर्स्ट क्लास/२ एसी/एसी चेअर कारमधील प्रवासासाठी मिळेल.

2
133 views

Comment