logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लोकसहभागातून जलसंधारण कामाचा शुभारंभ...

लोकसहभागातून जलसंधारण कामाचा शुभारंभ...

पुणतांबा ( शिवप्रहार न्यूज)डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण(संकल्पक मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा) चाळीसगाव यांच्या माध्यमातून दैनिक सकाळ रिलीफ फंडाच्या सीएसआर निधीतून पोकलेन मशीन उपलब्ध झाल्यामुळे व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिझेल खर्च करून राहाता-चितळीरोड पासुन वाकडी परिसरातील नाल्यातील व रामपुरवाडी धनगरबाबा तलावातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्याच्या जलसंधारण कामाचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून.श्री .अजितभाऊ पारख उपाध्यक्ष महाराष्ट्र केमीस्ट असोसिएशन ,श्री.सतिश वैजापूरकर दैनिक सकाळ,राहता तालुका बातमीदार,डॉ.बापुसाहेब पानगव्हाणे वृक्ष मित्र तथा संकल्पक साई योग फाउंडेशन,श्री.विठ्ठल पवार,चेअरमन साई बाबा संस्थान कर्मचारी सोसायटी, शिर्डी ,श्री.गोरख दंडवते,साकुरी श्री.किरण धुमाळ,कृषी अधिकारी रामपूरवाडी श्री.विनोद धनवटे पाच पाटील Mission 500 तसेच Mission 500 गाव प्रमुख बाळासाहेब ताराचंद भोरकडे ,देवेंद्र ओंकार भवर,संगम राधाकिसन भोरकडे,सुनिल ताराचंद सांबारे,महेश वसंतराव बोरावके,सोमनाथ दशरथ जगताप,दशरथ रंगनाथ ठमके,शरद नानासाहेब शेळके,सुनिल नामदेव शेळके,दिनकर पाटील सोनुळे तसेच निखिल गाढवे, अजिंक्य चव्हाण,निलेश सालपुरे,दिनेश साळुंके , मोहन तांबे,साई धनवटे,साई सांबारे, नंदू दवांगे,सुनील गिरमे,उमेश सांबारे, अनिल गाढवे,श्रद्धा सांबारे ,रोहिणी आग्रे ई. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे मागील वर्षी आळंदी साळुंके - भोरकडे बंधारा येथे झालेल्या कामाचे विशेष कौतुक केलं तसेच युवा शेतकरी सहभागी बघून त्यांचा या कामा प्रती आत्मविश्वास अजून वाढवला.तसेच दैनिक सकाळ वृत्तपत्रचे सतीश वैजापूरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या बरोबर अजित पार, विठ्ठल पवार,किरण धुमाळ यांनी होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.आलेल्या सर्व मान्यवरांनी डॉ.उज्वल कुमार चव्हाण,Mission 500 पाच पाटील टीम चाळीसगाव,यांचे विशेष आभार मानून "मिशन ५००" ही संकल्पना समजून घेऊन लोकचळवली मधून उत्तम प्रकारे जलसंधारण काम कसे केलं जाऊ शकतात तसेच मिशन ५०० संकल्पना,जलसंधारणात राज्यातील आदर्श मॉडेल ठरू शकतं असा आत्मविश्वास व्यक्त केला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment