logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पत्रकारितेतील जिद्द फळाला; बिडकर यांची तेलंगणा राज्याध्यक्षपदी नियुक्ती

पत्रकारितेतील जिद्द फळाला; बिडकर यांची तेलंगणा राज्याध्यक्षपदी नियुक्ती


हैदराबाद प्रतिनिधी :

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील गजानन गंगाधरराव बिडकर यांची पुरोगामी पत्रकार संघ (भारत) च्या तेलंगणा राज्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते हैदराबाद येथे वास्तव्यास असून, त्यांच्या निवडीमुळे पत्रकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गजानन बिडकर हे मागील दहा ते बारा वर्षांपासून हैदराबाद येथे स्थायिक असून, देगलूर येथून “साप्ताहिक महिमा खादीचा” हे वर्तमानपत्र चालवतात. लहानपणापासूनच त्यांना लिखाणाची आवड असून त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक प्रजावाणी मधील छोट्या-मोठ्या लेखांपासून केली. त्या काळातील संपादक सुधाकर डोईफोडे यांनी त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन देत त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला.
यानंतर त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने लेखन करत आपली ओळख निर्माण केली. दैनिक नांदेड सांज मध्ये शहर प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी पत्रकारितेचे बारकावे आत्मसात केले. तसेच धर्माबाद येथील प्रेमसिंग चव्हाण यांच्या साप्ताहिक “नव्या युगाची वाटचाल” मध्ये संपादकीय जबाबदारी सांभाळत त्यांनी पत्रकारितेतील अनुभव अधिक समृद्ध केला.
हैदराबादमध्ये वास्तव्यास आल्यानंतरही त्यांनी आपली लेखणी थांबू दिली नाही. समाजातील सामान्य व्यक्तींच्या गुणविशेषांवर प्रकाश टाकत, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बातम्यांना आपल्या वर्तमानपत्रात व पोर्टलमध्ये स्थान देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत नांदेड येथील दैनिक शिरोमणीचे संपादक शंकरसिंह ठाकूर व “नंदगिरीचा कानोसा” चे मुख्य संपादक मारुती शिकारे यांनी त्यांना राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले.
त्यांच्या निवडीची माहिती समजताच हैदराबादमधील मराठी बांधव व पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी गजानन बिडकर यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी तसेच संघटनेच्या प्रचार-प्रसारासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
5236 views

Comment