logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सौर ऊर्जा प्रकल्पातील तार चोरणारी टोळी गजाआड


धुळे : कासारे छाईल येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून तांब्याची तार लंपास करणाऱ्या टोळीला सोमवारी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी या कारवाईत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १९७किलो तांब्याची केबल आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जानेवारीतील गुन्ह्याचा समांतर

तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना तार चोरणारी टोळी शेवाळी शिवारात येणार 5 असल्याची माहिती न मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने संशयास्पद


तीन मोठे गुन्हे उघड

ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी साक्री पोलीस ठाण्यांतर्गत दोन आणि निजामपूर पोलीस ठाण्यांतर्गत एक अशा एकूण तीन ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

पिकअप क्र. एमएच १९ बीएम ३२६८ येताना दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग करून तीन जणांना ताब्यात घेतले. यात मच्छिद्र भटु जाधव (वय २५, रा. पेरेजपूर), प्रविण रविंद्र जाधव (वय २४, रा. पेरेजपूर) आणि सुलतान नुरा शहा (वय २६, रा. साक्री) यांचा समावेश आहे.

8
592 views

Comment