logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Pune PMC Budget 2026: भाजपने ‘संकल्पपत्रा’तील ‘शब्द’ फिरवला; ५०० चौरस फुटाच्या सदनिकाधारकांना करमाफी नाहीच!

Pune PMC Budget 2026: भाजपने ‘संकल्पपत्रा’तील ‘शब्द’ फिरवला; ५०० चौरस फुटाच्या सदनिकाधारकांना करमाफी नाहीच!पुणे : भाजपने महापालिका निवडणुकीत ‘संकल्पपत्र’ या नावाने सादर केलेल्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकाधारकांना मिळकतकरात माफी देण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भाजपने संकल्पपत्रातील हा ‘शब्द’ फिरविला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५०० फुटापर्यंतच्या सदनिकाधारकांना मिळकतकरात माफी देण्याऐवजी महिलांच्या मालकीच्या मिळकतीला अवघी ५० टक्के करसवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांना भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता देणाऱ्या पुणेकरांना भाजपने निराश केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सबस्क्राईब करा
Subscribe at Rs 599
लोकसत्ता सविस्तर
लोकसत्ता प्रीमियम
देवेंद्र फडणवीस
बिग बॉस मराठी ६
चर्चेतील बातमी
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented By
Campa
Gold
Partner
Reliance Digital
Celebration
Partner
McDowell's Soda
Style
Partner
Senco
Radio
Partner
Radio city
Marathi News
pune
pune municipal corporation budget bjp property tax waiver promise women discount pmc news pune print news ssb
Pune PMC Budget 2026: भाजपने ‘संकल्पपत्रा’तील ‘शब्द’ फिरवला; ५०० चौरस फुटाच्या सदनिकाधारकांना करमाफी नाहीच!
भाजपने महापालिका निवडणुकीत 'संकल्पपत्र' या नावाने सादर केलेल्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकाधारकांना मिळकतकरात माफी देण्याची घोषणा केली. मात्र....
Written by लोकसत्ता टीम
March 24, 2026 17:39 IST

Follow Us
BJP Pune Municipal Corporation property tax waiver promise | PMC Budget 2026 property tax relief for women | Pune Municipal Corporation news updates | BJP Sankalp Patra Pune civic polls
भाजपने ‘संकल्पपत्रा’तील ‘शब्द’ फिरवला; ५०० चौरस फुटाच्या सदनिकाधारकांना करमाफी नाहीच! (image credit - chatgpt ai)
पुणे : भाजपने महापालिका निवडणुकीत ‘संकल्पपत्र’ या नावाने सादर केलेल्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकाधारकांना मिळकतकरात माफी देण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भाजपने संकल्पपत्रातील हा ‘शब्द’ फिरविला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५०० फुटापर्यंतच्या सदनिकाधारकांना मिळकतकरात माफी देण्याऐवजी महिलांच्या मालकीच्या मिळकतीला अवघी ५० टक्के करसवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांना भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता देणाऱ्या पुणेकरांना भाजपने निराश केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपने जाहीरनाम्यात याबाबतचे आश्वासन दिले होते. मात्र, काँग्रेसने स्थायी समितीत हा प्रस्ताव देऊन भाजपची अडचण केली. हा प्रस्ताव मंजूर केल्यास त्याचे श्रेय काँग्रेसला जाईल आणि निर्णय न घेतल्यास भरघोस मते देणाऱ्या पुणेकरांची नाराजी पत्करावी लागेल, अशा कोंडीत सापडलेल्या भाजपने मध्यममार्ग स्वीकारला. ५०० चौरस फुटाच्या सदनिकाधारकांना मिळकत करात माफी देण्याऐवजी महिलांच्या मालकी हक्काला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या मालकीच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना ५० टक्के मिळकतकर माफी देण्याची योजना अंदाजपत्रकात जाहीर केली आहे. मात्र, ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी झालेल्याच महिलांच्या मालमत्तांना ही सवलत मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांना दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्षात भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या सरसकट करमाफीच्या आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याचे दिसून आले आहे.

४ लाख ४३ हजार मालमत्ता
शहरात पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींची संख्या ४ लाख ४३ हजार ५५३ आहे. या मिळकतींना सवलत दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने प्रशासनानेही नकारात्मक प्रतिसाद दिला होता. प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिल्याने भाजपने ही योजना न राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुणेकरांचा रोष कमी करण्यासाठी महिलांच्या मालकीच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना ५० टक्के मिळकत करमाफी देण्याची योजना आणली आहे.

0
0 views

Comment