अक्कलकोट कोळेकरवाडी येथील भिवा जाधव यांची कन्या पोलिस दलात भरती.
दि २४ (प्रतिनिधी-अंबादास गोरे)
अक्कलकोट तालुक्यातील कोळेकरवाडी या अतिशय दुर्गम व छोट्याशा गावातील शेतकरी श्री भिवा जाधव यांची कन्या दिपा जाधव यांची पोलिस दलात निवड झाली आहे.
नागपूर येथे झालेल्या पोलिस प्रशिक्षणानंतर शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी रक्ताचं पाणी करून आपल्या मुलीला चांगल्या प्रकारे शिक्षण देणारे तिचे आई वडील उपस्थित होते.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला पोलीस कन्येची मानवंदना स्वीकारत असताना आई वडीलांचे मन भरून आले अन् वडिलांनी आपल्या कन्येला असे उंचावून अभिनंदन केल्याचे निदर्शनास आले.