पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवीत ताफा अडविला
सरकारी शाळा बंदीचा एआयएसएफतर्फे निषेध
पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवीत ताफा अडविला
सरकारी शाळा बंदीचा एआयएसएफतर्फे निषेध
विलास केजरकर भंडारा.
भंडारा : राज्यातील १८ हजार सरकारी शाळा बंद करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट राज्य सरकारने घातला असल्याचा आरोप करत ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी रविवार ला जनता दरबारासाठी तुमसर दौऱ्यावर असताना पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून ताफा अडवला व जोरदार नारेबाजी करीत निषेध नोंदविला आहे.
तुमसर येथील जुना बस स्थानक परिसरात आंदोलकांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून गाडीवर पत्रक फेकले व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. महसूल कार्यालयातील नियोजित जनता दरबारासाठी जात असलेल्या पालकमंत्री मंत्री डॉ. पंकज भोयर यांचा ताफा अडवण्यासाठी एआयएसएफचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
विशेष म्हणजे सदर आंदोलन शहीद दिनाच्या एक दिवसाआधी झाले असून भगतसिंग यांनी सेंट्रल असेम्ब्ली मध्ये ज्या पद्धतीने आवाज करणारे बॉम्ब टाकत पत्रक फेकले होते. त्याची पुनरावृत्ती तुमसर शहरामध्ये झाली. यामुळे सदर आंदोलनाला अधिक महत्त्व प्राप्त होऊन याची चर्चा राज्यभर होत आहे.
आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चौपकर यांच्यासह आंदोलक महाविद्यालयीन तरुण-तरुणींना तातडीने ताब्यात घेतले. भाजप सरकार खाजगीकरणाला खतपाणी घालून सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप यावेळी वैभव चोपकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नसल्याचे आश्वासन दिले असतानांही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे “पालकमंत्र्यांपेक्षा पोलीस प्रशासन मोठे आहे का?” असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
"राज्यातील शाळा बंदी व विक्री चा निर्णय सरकारने तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सरकारमधील प्रत्येक मंत्र्याला एआयएसएफ च्या कार्यकर्त्यांकडून ठीक-ठिकाणी काळे झेंडे दाखवीत ताफे अडविण्यात येतील. तेव्हा या घटनेचा बोध घेत सरकारने तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात"
"वैभव चोपकर, राज्याध्यक्ष AISF महाराष्ट्र"
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015