logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वीर यांच्या "संगर" निवासस्थानी भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे उत्स्फूर्त स्वागत

वीर यांच्या "संगर" निवासस्थानी भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे उत्स्फूर्त स्वागत

बीड प्रतिनिधी

एकतानगर नाळवंडी नाका परिसरातील “संगर” या निवासस्थानी चैत्यभूमी, मुंबई येथील भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघ यांचे वीर परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात स्वागत, सत्कार व भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कालकथित नारायण वीर शिकवलेल्या धम्माच्या मार्गावर मार्गक्रमण करत वीर परिवार ने आज धम्म सेवा केली आहे.

धम्मरथाद्वारे चैत्यभूमी येथून आगमन झालेल्या भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे आगमन होताच परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. यावेळी अॅड.चंद्रवणी वीर तसेच समाजसेवक पुरुषोत्तम उर्फ (गोटु) वीर यांनी सहकुटुंब उपस्थित राहून भंन्ते व संघाची आदरपूर्वक सेवा केली.

वीर परिवाराने अत्यंत श्रद्धा व समर्पण भावनेने भिक्खू संघाचे स्वागत करत पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. तसेच सर्व भिक्खूंना सन्मानपूर्वक भोजनदान देण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमात शांतता, करुणा व बंधुभाव यांचा सुंदर संदेश देत भंन्ते डॉ. सुमेधबोधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुंदर, शिस्तबद्ध व धम्ममय भावाने पार पडला असून परिसरात याची विशेष चर्चा रंगली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment