दिनांक 21 मार्च मन सुन्न करणारी एक घटना घडली
दिनांक 21 मार्च मन सुन्न करणारी एक घटना घडली
माझ्या मतदारसंघातील चिंचोली सांगळे (ता. लोणार) येथील साध्या कष्टकरी कुटुंबाचा आधार असलेलं एक छोटंसं किराणा दुकान क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.
श्री. विठ्ठल लोभाजी कुटे यांचे किराणा दुकान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे पूर्णतः जळून खाक झाले.
ज्या दुकानातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.
जिथे रोजच्या कष्टाने आपलं स्वप्न ते फुलवत होते...
ते सगळं एका क्षणात राख झालं...!!!
आज मी व आमचे लोणार चे तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवत आणि कार्यकर्त्यांसह त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
त्यांच्या डोळ्यातलं दुःख, असहाय्यता आणि तुटलेलं मन पाहून शब्दच सुचले नाहीत...
फक्त एकच केलं.. त्यांना धीर दिला, आणि सांगितलं...
"तुम्ही एकटे नाही आहात."
तहसीलदार, लोणार यांच्या टीमने तात्काळ पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठवला आहे.
मी स्वतः या प्रकरणात पाठपुरावा करून
श्री. विठ्ठल कुटे यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
या कठीण प्रसंगी आपण सर्वांनीही त्यांच्यासोबत उभं राहूया...!!!