logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ परळी नगरपरिषद कंत्राटी कामगार शाखा स्थापन

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ
परळी नगरपरिषद कंत्राटी कामगार शाखा स्थापन

अध्यक्षपदी विक्रांत समिंदरसावळे, उपाध्यक्ष अमोल मस्के, सचिव सुमेर समिंदरसावळे यांची नियुक्ती

परळी वै प्रतिनिधी : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) या ट्रेड युनियनची नगरपरिषद कंत्राटी कामगारांची परळी वैजनाथ शाखा अधिकृतपणे स्थापन करण्यात आली असून, या शाखेला राज्य कार्यकारिणीकडून मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर संघटनेची नोंदणी भारतीय ट्रेड युनियन अधिनियम 1926 अंतर्गत (रजि. क्र. ALC/17/10744, दि. 30 मे 2013) झाली आहे.

मा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली ही संघटना देशभरातील सरकारी व खाजगी क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी लढा देत असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे नगरपरिषद कंत्राटी कामगारांची शाखा स्थापन करण्यात आली आहे.

दि. 20 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत विक्रांत सूर्यकांत समींदरसवळे (अध्यक्ष), बालाजी मारोती गजबे (कार्यकारी अध्यक्ष), अविनाश वसंतराव गायकवाड (महासचिव), अमोल अर्जुन मस्के (उपाध्यक्ष), सुमेर सूर्यकांत समींदरसवळे (सचिव ) संध्या भैय्यासाहेब जगतकर (कोषाध्यक्ष )लता पंडित इंगळे यांच्यासह सदस्य पदी सुनील माणिकराव जगतकर, कैलास हरिभाऊ उपाडे भैय्यासाहेब शिवाजीराव जगतकर अतुल अनिल चौरे, सुभाष गित्ते आदींचा समावेश आहे.

नवीन कार्यकारिणीचे पदाधिकारी नगरपरिषद कंत्राटी कामगारांसह संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधणार असून, भारतीय कामगार कायद्यांनुसार मिळणाऱ्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणार आहेत. कामगारांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करत त्यांच्या न्याय्य मागण्यांना वाचा फोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत ही माहिती प्रसारमाध्यमांसाठी देण्यात आली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment