बुलढाणा जिल्ह्यासाठी युवक संरक्षणात नवी जबाबदारी
बुलढाणा : भ्रष्टाचारमुक्त भारताच्या संकल्पनेतून कार्य करणाऱ्या नॅशनल अँटी
बुलढाणा जिल्ह्यासाठी युवक संरक्षणात नवी जबाबदारी
बुलढाणा : भ्रष्टाचारमुक्त भारताच्या संकल्पनेतून कार्य करणाऱ्या नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या माध्यमातून दिपक शिवाजी कायंदे यांची जिल्हा मुख्य युवक संरक्षण अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात आले आहे
ही संस्था NITI Aayog अंतर्गत नोंदणीकृत असून तसेच भारत सरकारच्या Ministry of Micro, Small and Medium Enterprises मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त आहे. तसेच संस्थेला ISO 9001:2015 प्रमाणपत्र मिळालेले आहे.
नियुक्तीनंतर दिपक कायंदे यांनी युवकांचे संरक्षण, समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.