पोलीस असल्याचे सांगून फसवणारा श्रीरामपूरचा सज्जाद इराणी पकडला...
पोलीस असल्याचे सांगून फसवणारा श्रीरामपूरचा सज्जाद इराणी पकडला...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- पोलीस असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या श्रीरामपूरातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. सज्जाद गरीब शहा इराणी (वय ४७), रा. इराणी गल्ली, वार्ड नंबर १, श्रीरामपूर असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याने तोफखाना व संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. त्याचा चुलत भाऊ मुस्लीम यासीन इराणी रा. इराणी गल्ली, वार्ड नंबर १, श्रीरामपूर याने देखील त्याला या गुन्ह्यात मदत केली असल्याचे समोर आले आहे. तो पसार आहे.
फिर्यादी रविंद्र नारायण राजहंस रा.सावेडी, अहिल्यानगर हे भैय्या गंधे यांच्या बंगल्यासमोर जॉगिंग पार्क जवळ सावेडी येथे फोन करण्यासाठी गाडीवर थांबलेले असतांना तेथे मोटार सायकलवर डोक्यात हेल्मेट घालुन आलेला इसम व पायी चालत आलेला इसम या दोघांनी संगणमत करुन फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगुन सक्सेना यांचा पत्ता विचारण्याचे कारण देवुन एकाने त्याचे पोलीस असल्याचे आय कार्ड दाखवुन फिर्यादीचे खिशातील मोबाईल सुट्टै पैशाची चिल्लर व हातातील सोन्याचे दोन व तांब्याच्या दोन अंगठ्या असे काढुन पिशवीत ठेवले आहेत असे सांगुन त्यातील सोन्याच्या दोन अंगठ्या व तांब्याच्या दोन अंगठ्या विश्वास संपादन करुन घेवुन जावुन फिर्यादीची फसवणुक केली होती. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
तपासादरम्यान हा गुन्हा सज्जाद इराणी याने केल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने व त्याच्या चुलत भावाने मिळून गुन्हा केल्याची कबूली दिली. सज्जाद इराणी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी घेतली असता, त्याच्याविरूध्द मुंबई, जळगाव, पिंपरी चिंचवड, पुणे शहर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे २३ नोंदवलेले गुन्हे आढळले.तसेच या व्यतिरिक्तही आणखी सुमारे १०० ते १२५ गुन्हे असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015