logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेलुद–लिहा महामार्गावरील सिमेंट रस्त्याची दुर्दशा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत संताप

भोकरदन तालुक्यातील शेलुद ते लिहा या महामार्गावर, सरस्वती विद्यामंदिर शाळेसमोरील सिमेंट रस्ता काही वर्षांपूर्वी मोठ्या खर्चाने तयार करण्यात आला होता. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम आणि सिमेंटचा अपुरा वापर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, सिमेंटचे चिरे उघडकीस आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे. विशेष म्हणजे, शाळेसमोरच रस्ता खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संदर्भात यापूर्वीही अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, जर या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

75
1995 views

Comment