लाचखोर अधीक्षकाला ३ वर्षे सश्रम कारावास
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील
अंगणवाडीचे काम वेळेवर न केल्यामुळे बजावण्यात आलेली नोटीस मागे घेण्यासाठी आणि प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी २०१६ मध्ये दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तत्कालिन कार्यालयीन अधीक्षक पंकज, विक्रम पाटील याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला ३ वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.