ओबीसी जनगणनेसाठी लाखनी तालुका सरपंच संघटना एकवटली,
२२ मार्चच्या जिल्हास्तरीय मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार!
ओबीसी जनगणनेसाठी लाखनी तालुका सरपंच संघटना एकवटली,
२२ मार्चच्या जिल्हास्तरीय मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार!
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- पंचायत समिती लाखनी येथील सभागृहात १८ मार्च २०२६ ला तालुका सरपंच संघटनेची महत्त्वाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत प्रलंबित शिक्षक भरती, मनरेगाचे प्रश्न आणि प्रामुख्याने ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी एल्गार पुकारण्यात आला. व २२ मार्च २०२६ ला भंडारा येथे निघणारा भव्य मोर्चा आणि २३ मार्च २०२६ ला दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाला सरपंच संघटनेने पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष परसराम फेंडरकर होते. यावेळी मंचावर सचिव रुपचंद निर्वान, कोषाध्यक्ष मनोहर बोरकर, प्रसिद्धी प्रमुख सुरज निखाडे, ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रा. सिंगनजुडे यांनी ओबीसी जनगणनेचे महत्त्व विषद करतांना सांगितले की, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी रविवार दिनांक २२ मार्च २०२६ ला भंडारा येथे जिल्हास्तरीय मोर्चा व २३ मार्च ला दिल्लीत आंदोलन आयोजित केले आहे. सरपंच संघटनेने या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष फेंडरकर यांनीही आपल्या मार्गदर्शनातून संघटनेची भूमिका स्पष्ट केली. सभेत विविध जनहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रिक्त असलेल्या शिक्षक पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, तात्काळ भरती करण्याची मागणी करण्यात आली. मनरेगा कामांबाबत उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर चर्चा झाली. उपस्थित मनरेगा अधिकारी राहुल गिऱ्हेपुंजे यांनी सरपंच बांधवांच्या शंकांचे व प्रश्नांचे जागीच निराकरण केले. सरपंचांची मोठी उपस्थिती या सभेला तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात प्रामुख्याने ललिता कोरे, आशा सिंगनजुडे, सुनीता कहालकर, ममता टिचकुले, इंदिरा बांडेबूचे, आचल फेंडर, उपेंद्र शेंडे, नरेश फुंडे, शामाजी बेदवार, खुमेश बोपचे, भारत कावळे,रामलाल पाटणकर, योगेश झलके यांच्यासह अनेक सरपंच बांधव व भगिनी उपस्थित होत्या.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015