logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पाचोरा येथे दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाची उत्साहात सांगता.. !

पाचोरा येथे दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाची उत्साहात सांगता झाली
पाचोरा प्रतिनिधी :-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
पाचोरा : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वैचारिक बळकटीसाठी आणि संघटनात्मक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाची आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पुनगाव रोड येथे पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिरात नगरदेवळा व पिंपळगाव मंडळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पक्षविचार अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मार्गदर्शन करताना ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी भारतीय जनता पक्षाचा इतिहास अत्यंत सखोल व प्रभावी पद्धतीने उलगडून सांगितला. भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रनिष्ठ विचारसरणी आणि दूरदृष्टी असलेले संघटन आहे. भविष्यातील भारत घडविण्याचा स्पष्ट वैचारिक दृष्टिकोन पक्षासमोर असून त्याच दिशेने कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.

त्यानंतर झालेल्या सत्रात भाजपा नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी “अंत्योदयातील संपृक्तता” या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रातील भाजपा सरकार तसेच महाराष्ट्रातील युती सरकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध कल्याणकारी योजना पोहोचविण्याच्या उद्देशाने सातत्याने प्रयत्नशील आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवणे हीच खरी अंत्योदयाची संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून समाजातील वंचित घटकांपर्यंत विकासाचा प्रवाह नेण्याचे कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण महाअभियानात पक्षाचा इतिहास, संघटनात्मक कार्यपद्धती, वैचारिक अधिष्ठान, सोशल मीडिया व नमो ॲपचा प्रभावी वापर, बूथ व्यवस्थापन तसेच अंत्योदयाची संकल्पना अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षविचारांची नव्याने ओळख मिळाली तसेच संघटन अधिक सक्षम करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

या कार्यक्रमाला सुभाषभाऊ पाटील, गोविंद शेलार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील व सविताताई शेळके तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्षाची विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. संघटन अधिक सक्षम, सजग आणि जनतेशी अधिक दृढपणे जोडण्यासाठी हा प्रशिक्षण उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

0
0 views

Comment