logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

* स्काऊट गाईड कॅम्प बी.एड.महाविद्यालयात यशस्वीरित्या संपन्न *

साकोली प्रतिनिधी
दिनांक 16 मार्च 2026 व 17 मार्च 2026 ला डॉ. एस राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन साकोली येथे स्काऊट गाईड कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कॅम्पच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्या डॉ. मंजुश्री घोटेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. गणेश सार्वे व श्री. केशव सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दिनांक 17 मार्च 2026 रोजी शासकीय महाविद्यालय, भंडारा येथील डॉ. नीता चौरे मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. मंजुश्री घोटेकर यांनी केले. गणेश सार्वे सर व केशव सूर्यवंशी सर यांनी स्काऊट गाईड चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तिचा इतिहास, बॅच, खुणा तसेच विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या या कॅम्पमध्ये विविध प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी प्रतिनिधी प्रीती सोनवणे यांनी केले. रुणाल कडुकार व धनश्री वंजारी यांनी स्काऊट गाईड कॅम्प बद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रण भैरव गोटेफोडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदर्श शेंडे यांनी केले.

या कॅम्पसाठी बी.एड. चतुर्थ सेमिस्टरचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्राची झिंगरे, प्रा. सरिता ओगले, प्रा. डॉ. रंजना लांजेवार, प्रा. रोहिणी खेडकर, प्रा. अक्षय पुस्तोडे, प्रा. शैला टिचकुले, प्रा. चेतन कापगते, मृणालिनी बावनकर, योगेश सोनवणे,प्रेमदास रामटेके तसेच सर्व छात्र-छात्राध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले.

*सदर स्काऊट गाईड कॅम्पमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण व सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली.*

87
3412 views

Comment