*बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा मध्ये नांदेड जिल्ह्याला मिळणार पहिल्यांदाच प्रतिनिधित्व*
*बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा मध्ये नांदेड जिल्ह्याला मिळणार पहिल्यांदाच प्रतिनिधित्व*
बार कौन्सिलच्या इतिहासात प्रथमच नांदेड जिल्ह्याचे कोरले जाईल नाव
नांदेड :- प्रतिनिधी -
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक २०२६ ही जाहीर झालेली असून येणाऱ्या २४ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असून राज्यभरातील वकील बंधू,भगिनींच्या न्याय हक्कासाठी ही परिषद कार्य करत आलेली आहे.वर्तमानस्थितीत संपूर्ण राज्यातून ०५ महिला,१८ पुरूष अशा एकूण २३ जागांसाठी १५५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले असून पात्र उमेदवारांची अंतिम सूची अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे.मराठवाड्याच्या पूर्व भागातील नांदेड जिल्ह्यातून एकच उमेदवार पात्र ठरलेला असल्याने नांदेड जिल्ह्यातील वकील बांधवांची एकजूट दाखविण्याची खूपच महत्त्वाची,मोठी वेळ आणि सोनेरी संधी आलेली आहे.कारण आपल्या घरचा,हक्काचा व सदैव आपली कामे करणारा,सर्वांना समान मानुन न्याय देणारा माणूस निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे.नांदेड जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज दाखल करत पात्र ठरलेले अनुक्रमांक ६३ - अॅड. नितीन लक्ष्मणराव कागणे हे मृदू,स्मितभाषी,मनमिळावू,माजी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील नांदेड व माजी जिल्हा सचिव अधिवक्ता संघ नांदेड हे असून त्यांना प्रशासकीय व वकील बांधवांच्या समस्यांचा दांडगा अभ्यास असल्याने निश्चितच वकील बंधू आणि भगिनींच्या पाठीशी सक्षमपणे खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून अनेकवेळेला ते नेहमी समोर आलेले आहेत.यावेळी जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ विधिज्ञ बांधवांनी तर पूर्णतः अॅड. नितीन कागणे यांना पुर्णपणे पाठिंबा जाहीर करत स्वतः जल्लोषात सहभाग नोंदवत निवडणूक प्रचारात आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीला निवडून आणण्याबाबत ठाम भूमिका निभावलेली दिसत आहे.नांदेड जिल्ह्यातून जास्तीत जास्त मतदान झाले तर निश्चितच आपल्या जिल्ह्याला योग्य स्थान मिळेल आणि आपला घरचा व हक्काचा माणूस बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या सदस्य रूपाने भविष्यात काम करण्यासाठी सज्ज होईल व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा मध्ये नांदेड जिल्ह्याला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळून बार कौन्सिलच्या इतिहासात प्रथमच नांदेड जिल्ह्याचे नाव कोरले जाणार
असे मत नांदेड जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालय,अतिरिक्त सत्र न्यायालय,कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय,धर्मादाय आयुक्त व सर्व तालुकास्तरीय न्यायालयातील सर्व वकील बंधू,भगिनी यांनी व्यक्त केले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015