logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वाचवतंय कोण ? गुन्हा नोंद होणार - तुळजापूर यात्रा मैदान घोटाळा, बनावट रेखाकन नकाशे

वाचवतंय कोण ? गुन्हा नोंद होणार - तुळजापूर यात्रा मैदान घोटाळा, बनावट रेखाकन नकाशे

अहवाल गुलदस्त्यात, काही मुद्याना 'क्लीन चिट' - जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्ष

धाराशिव - समय सारथी

तुळजापूर येथील यात्रा मैदान घोटाळा प्रकरणी चौकशी समितीने चौकशी पुर्ण केली असल्याची सूत्रांची माहिती असुन अहवाल गुलदस्त्यात आहे. चौकशी समितीने तक्रारीतील काही मुद्याना 'क्लीन चिट' दिली असुन बनावट रेखाकन नकाशे व इतर कागदपत्रे बाबतीत कारवाईची शिफारस केली आहे. समिती हा अहवाल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे मान्यता व पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करणार असुन जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणात तत्कालीन अधिकारी, गाव पुढारी व काहींना वाचवण्यात येत असुन त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

वेळ काढूपणा करण्यासाठी व कारवाईसाठी पुन्हा एकदा समिती नेमू नये म्हणजे झाले.. अशीच काहीशी स्थिती असुन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या निर्देशाला एक प्रकारे केराची टोपली दाखवली जात आहे. भुसंपादन रद्द झाल्याचे शासन किंवा जिल्हाधिकारी यांचे कोणतेही लेखी आदेश नाहीत. आरक्षण रद्द झाल्याचे शासन किंवा नगर विकास विभाग यांचे आदेश नाही. एमआरटीपी कायद्यानुसार बांधकाम रवानगी रद्द करून संबंधित अधीकाऱ्यावर गुन्हे नोंद होणे गरजेचे आहे. बोगस लेआऊटच्या मुद्यावर समितीची एकवाक्यात असल्याचे कळते. बोगस कागदपत्रे व त्या आधारे केलेल्या दस्त नोंदणी प्रकरणात फौजदारी गुन्हे नोंद करणे अपेक्षित आहे.

तुळजापूर नगर परिषदेने यात्रा मैदानासाठी सर्वे नंबर 138 मधील 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन संपादीत केली मात्र ती जागा हडप केल्याची व विक्रीची तक्रार संभाजी शिवाजीराव नेप्ते व किरण माणिकराव यादव यांनी केली होती, त्यानंतर त्या तक्रारीची तहसीलदार अरविंद बोळंगे अध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार सचिव व सदस्य मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी अशोक भातभागे यांनी चौकशी करून अहवाल दिला. त्यातील अनेक मुद्याना क्लिन चिट दिली आहे.

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीत उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी ओंकार देशमुख सचिव, उपाध्यक्ष उपजिल्हाधिकारी निवडणुक शिरीष यादव, सदस्य म्हणुन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख, जिल्हा सहनिंबधक, सहाय्यक नगर रचनाकार व उपायुक्त नगर परिषद प्रशासन त्रिंबक डेंगळे पाटील हे सदस्य आहेत.

बनावट रेखाकन नकाशे, अकृषी व बांधकाम परवाने, खरेदी विक्री खत करणारे तत्कालीन नगर परिषद, भुमी अभिलेख, मुद्रांक विभागातील अधिकारी, काही बाबींना मंजुरी दिलेले नगर परिषदेतील तत्कालीन काही पुढारी व अधिकारी कारवाईच्या रडारवर आहेत. बोगस लेआऊट दस्तासह काही बाबी फौजदारी कारवाईशी तर काही बाबी दिवाणी स्वरूपाच्या आहेत.

माजी उपनगराध्यक्ष पंडीत जगदाळे, हरिश्चंद्र जगदाळे, गंगाधर चव्हाण यांच्यासह 27 जणांवर बनावट दस्ताऐवज, खोटे निवेदन व शपथपत्र, शासनाचे नुकसान, दिशाभुल व फसवणुक केल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार सुरेश धस यांनी यात लक्ष घातल्यानंतर या प्रकरणाला गती आली होती मात्र दप्तर दिरंगाई अजूनही होत आहे. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अमोल शिवाजीराव जाधव यांनी देखील आवाज उठवत कारवाईसाठी पाठपुरावा सुरु केला आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
88 views

Comment