logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

घायवळच्या कानशिलात लावणाऱ्या पै.सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू...

घायवळच्या कानशिलात लावणाऱ्या पै.सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू...


अहिल्यानगर (शिवप्रहार न्यूज)- पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या गँगने १३ दिवसांपूर्वी केलेल्या गोळीबारामुळे जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.पुणे इथल्या ससून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सागर मोहोळकर याच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्यात आता खुनाचे वाढीव कलम लागणार आहे.
सागर मोहोळकर याच्यावर बुधवार रोजी (ता.4 मार्च) जामखेड शहरात हल्ला झाला होता. पुण्यातील नीलेश घायवळ गँगने त्याच्यावर बेछुट गोळीबार केला होता. यात त्याच्या शरीरात ०६ गोळ्या लागल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या काढण्यात आल्या होत्या.परंतु चार गोळ्या त्याच्या शरीरात तशाच होत्या.
शस्त्रक्रिया करण्याकरिता शरीराची तशी स्थिती नव्हती. त्यामुळे त्या ०४ गोळ्या सागर मोहोळकर याच्या शरीरात तशाच होत्या. यातच त्याचे ब्लड प्रेशर कमी-जास्त होत होते. यातूनच त्याला आज त्रास होऊ लागला अन् त्याच्या शरीराच्या हालचाली थांबल्या व त्याचा मृत्यू झाला.
सागर मोहोळकर याच्यावर अगदी जवळून गोळाबार करण्यात आल्या होता. त्याच्या तोंडात देखील गोळी मारण्यात आली होती. जखमी अवस्थेत सुरवातीला जामखेड, त्यानंतर अहिल्यानगर शहर आणि पुढे पुणे इथल्या ससून रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते.गेल्या १३ दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता. सागर मोहोळकर याच्यावर हल्ला करणारे दोन दुचाकीवरून आले होते. हल्ल्यामागे नीलेश घायवळ गँग असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवला.
धाराशिव इथल्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत गेल्यावर्षी 11 एप्रिल 2025 मध्ये मोहोळकर याने घायवळ याच्या कानाखाली लगावली होती. यानंतर मोहोळकर चर्चेत आला होता. मोहोळकर याने नंतर यावरून घायवळसमोर माफीनामा सादर केला.पण मोहोळकर याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर येताच,पाळत ठेवून घायवळ गँगने त्याचा काटा काढल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिस आणि जामखेड पोलीस हल्लेखोरांच्या मागावर आहे.पण या हल्ल्यानंतर मोहोळकर याच्या राक्षसी ताकदीच्या कथा चर्चेत आल्या. त्याच्या तोंडात गोळी लागली होती. त्याने ती हाताने काढण्याचा प्रयत्न करणे,पोलीस देखील त्याला पकडायचे म्हटल्यावर थरथराचे, त्याला पकडण्यासाठी दहा पेक्षा जास्त पोलिसांची गरज लागायची अशी त्याच्याकडे ताकद होती.
सागर मोहोळकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याच्याविरोधात ०२ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. पहिल्या खुनात तो तुरुंगात असताना तिथं ही त्याने आणखी एक खून केला होता.मारामारी केल्याप्रकरणी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. नाशिक कारागृहातून तो महिन्याभरापूर्वी बाहेर आला होता. त्यातच त्याच्यावर हा हल्ला झाला अन् आज त्यात त्याचा मृत्यू झाला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
12 views

Comment