logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मजुरांचे हक्काचे पैसे अडकले; आयुक्त कार्यालयाकडे थेट सवाल....

मनरेगा अंतर्गत १०० दिवसांनंतरच्या मजुरीचा प्रश्न ऐरणीवर; आयुक्त कार्यालयाला ई-मेलद्वारे माहितीची मागणी
अहिल्यानगर, : मनरेगा अंतर्गत १०० दिवसांचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील मंजूर मजुरीचे पैसे अनेक मजुरांच्या खात्यात अद्याप जमा झाले नसल्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. या संदर्भात आयुक्त, रोजगार हमी योजना (MGNREGA/EGS), महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.
सदर प्रकरणी COM/PLEG/2026/104 या तक्रार क्रमांकाद्वारे मंजूर निधी असूनही मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा होण्यास विलंब का होत आहे, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
मनरेगा अंतर्गत मजुरांना वेळेवर मजुरी मिळणे हा त्यांचा हक्क असून, निधी मंजूर असतानाही मजुरी प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. तसेच, आयुक्त कार्यालयाकडे विचारलेल्या या सार्वजनिक प्रश्नावर थेट उत्तर देण्याऐवजी तक्रार जिल्हा स्तरावर पाठवण्यात आल्याबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
सदर विषय हा राज्यातील हजारो मजुरांच्या हिताशी संबंधित असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन स्पष्ट उत्तर द्यावे व मजुरांचे थकीत पैसे लवकरात लवकर जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

रविकुमार प्रदीप शिंदे
Social Media Activist
All India Media Association

9
5796 views

Comment