श्रीरामपुरातील मोरया मोबाईल शॅापी फोडणारे चोरटे पकडले...
श्रीरामपुरातील मोरया मोबाईल शॅापी फोडणारे चोरटे पकडले...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) या घटनेची थोडक्यात माहिती अशी की,दिनांक 13/03/2026 रोजी फिर्यादी अतिष नवनित काटारीया, वय 32 वर्षे, धंदा- मोबाईल शॉपी, रा- वार्ड नं.07, श्रीरामपूर यांचे 12 मार्च च्या रात्री धान्य गल्ली वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथील मोरया मोबाईल शॉपी हे दुकान फोडुन त्यातुन 20,000/- रु. किं. चे मोबाईलचे साहित्य चोरी गेले होते.त्यावरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 189/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (ब),331(3) (4) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास तात्काळ सदर गुन्हयातील गेले मुद्देमालाचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व धान्य गल्ली, बाजारतळ सर्कल, वॉर्ड नं.03 येथील परिसरातील लोकांकडे अत्यंत बारकाईने चौकशी केली.त्यातुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1) बलदेवसिंग मनचुसिंग टाक,वय 20 वर्षे, रा. सर्कल बाजारतळ,वॉर्ड नं. 03, श्रीरामपूर याने त्याच्या साथिदारासह मिळून केला असून तो सध्या संगमनेर रोड येथील नाना चहा येथे बसलेला आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता तेथे बलदेवसिंग टाक हा त्याचा साथिदार नामे 2) विशाल भरत बोरुडे, वय 25 वर्षे, रा. बाजारतळ, वॉर्ड नं. 03, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर याच्यासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांच्याकडे नमुद गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालक याच्यासह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली व त्यांच्याकडुन नमुद गुन्हयातील गेला सर्व मुद्देमाल ज्यामध्ये वेगवेगळे हेडफोन,चार्जर,कार चार्जर,एअरबर्ड्स,स्पीकर,केबल इ.असे जप्त करण्यात आले.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेकॉ/ जयवंत तोडमल, पोहेकों/भागवत शिंदे, पोकों/संपत बडे, पोकॉ/अमोल पडोळे, पोकों/ संभाजी खरात, पोकों/सागर बनसोडे, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/सचिन दुकळे, पोकों/रामेश्वर तारडे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/पांडुरंग चौधरी, पोकों/गणेश तुपे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों/जयवंत तोडमल हे करीत आहेत.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015