logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल शुभम सातंगे यांची ‘वीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2026’ साठी निवड....!

काटोल प्रतिनिधी :-
नागपूर जिल्ह्यातील अंबाडा गावाचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे. शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेचे सदस्य व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शुभम जितेंद्रपंत सातंगे यांची समाजसेवेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘वीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार 15 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील सोनभद्र (दुधी) येथे प्रदान करण्यात येणार आहे.
रक्तदान, अवयवदान, देहदान व नेत्रदान याबाबत जनजागृती करणे तसेच थॅलेसेमियासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना मदत करण्यासाठी केलेल्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे त्यांना हा सन्मान मिळत आहे. समितीचे संरक्षक रामकुमार बजिया यांनी सांगितले की, शुभम सातंगे यांच्या प्रेरणेने परिसरातील अनेक तरुण समाजसेवेच्या कार्यात सहभागी झाले असून आज ते रक्तदान अभियानाशी सक्रियपणे जोडले गेले आहेत.
शुभम सातंगे यांनी आतापर्यंत २९ वेळा रक्तदान व ५ वेळा प्लाझ्मा दान केले आहे. विशेषतः डेंग्यू महामारीच्या काळात तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी एसडीपी दान करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. गर्भवती महिलांसाठीही त्यांनी तातडीने मदत करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा समितीच्या माध्यमातून विविध आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत तत्काळ मदत पुरवली जाते. या समितीचे सेवाकार्य केवळ नागपूरपुरते मर्यादित नसून विविध ठिकाणी गरजूंना मदत केली जाते.
यापूर्वीही शुभम सातंगे यांना अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर सन्मानित करण्यात आले आहे. ‘कोटा प्राईड नॅशनल अवॉर्ड 2022’ अंतर्गत थॅलेसेमिया निर्मूलन समितीतर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या कार्यातून समाजसेवेची अखंड भावना आणि समर्पण स्पष्टपणे दिसून येते.
“एक हात निस्वार्थ मदतीचा” या भावनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन समाजासाठी कार्य करणे हेच आपले कर्म असल्याचे शुभम सातंगे यांचे मत आहे.
त्यांच्या या महान कार्याला विनम्र अभिवादन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!

6
1193 views

Comment