राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे राहुरी येथे स्वागत
अहिल्यानगर, दि. १५ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभासाठी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे राहुरी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.
#महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #GovernorOfMaharashtra #JishnuDevVarma #MPKV #RahuriNews #AgricultureConvocation #RamShinde #DattatrayBharne #AhilyanagarUpdate #AgricultureResearch #VVIPVisit #EducationMaharashtra #ConvocationCeremony #महात्मा_फुले_कृषी_विद्यापीठ