शेतजमीनीवरून मुलगा,सून,जावयाने केला खून;LCB कडून ०२ खुनांचा उलगडा...
शेतजमीनीवरून मुलगा,सून,जावयाने केला खून;LCB कडून ०२ खुनांचा उलगडा...
अहिल्यानगर (शिवप्रहार न्यूज)- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका 60 वर्षीय वृद्धाचा आणि अकोला जिल्ह्यातील एका तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याच्या दोन धक्कादायक घटना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किरणकुमार कबाडी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण कारवाईत अत्यंत चातुर्याने तपास करत दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणल्या आहेत.शेतजमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने,सुनेने आणि जावयाने मिळून बापू आनंदा गाढवे यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जावई सुनील रामदास राठोड आणि मुलगा आकाश बापू गाढवे यांना अटक केली असून, त्यांचे इतर साथीदार फरार आहेत.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, 5 मार्च 2026 रोजी आकाश बापू गाढवे याने आपले वडील बापू गाढवे हे बेपत्ता असल्याची तक्रार मिरजगाव पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता आकाश गाढवे याच्यावरच संशय बळावला.त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मृताचा जावई सुनील राठोड आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी सुनील राठोड हा शेगाव येथे लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात सुनील राठोड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झाला, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसारबापू गाढवे हे आपली शेतजमीन विकण्यास विरोध करत होते. याच रागातून 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी दीडच्या सुमारास मुलगा आकाश, सून पायल ऊर्फ आकांक्षा आणि जावई सुनील राठोड यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बापू गाढवे यांचे तोंड दाबून व गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारील लाकडे गोळा करून डिझेलच्या साहाय्याने मृतदेह जाळून टाकला. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान मुख्य आरोपी सुनील राठोड याने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे शीतल लिंबाजी सोंगेवाड (रा. परभणी) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. शीतल ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने त्याने 16 नोव्हेंबर 2025 रोजी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह अकोला जिल्ह्यातील धनेगाव (ता. बाळापूर) परिसरात अर्धवट जाळून टाकला होता. या कबुलीमुळे बाळापूर पोलीस ठाण्यातील खुनाचा गुन्हाही उघडकीस आला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015