*ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जलक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी*
*ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जलक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी*
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज च नागपूर विद्यापीठ अंतर्गत श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक व वॉटर स्पोर्ट अकॅडमी, कारधा (भंडारा) यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा नदी येथे आंतर-महाविद्यालयीन कॅनॉईंग, कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा २०२५–२६ मोठ्या उत्साहात नुकतीच पार पडली. या स्पर्धेत ६० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय परसोडी, येथील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक प्रकारात यश संपादन केले.
ड्रॅगन बोट २०० मीटर, ५०० मीटर व १००० मीटर या सांघिक प्रकारात महाविद्यालयाच्या कु. प्रांजली दामोधर वंजारी, अभिजित आसोले, रोहित साकोरे, रितेश शेंडे यांनी सहभाग घेतला. हे सर्व विद्यार्थी बी. ए. प्रथम वर्षाला शिकत आहेत. या अजिंक्यपद स्पर्धामध्ये त्यांची विद्यापीठाच्या चमू मध्ये निवड करण्यात आली असून कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावच्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कायकिंग व कॅनॉईंग या स्पर्धेत भाग घेणार आहेत. या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, तालबद्ध खेळ, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर दोन्ही संघांनी लाटांवर वर्चस्व गाजवत अजिंक्यपद पटकावले.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा संचालक डॉ. वंदना मोटघरे (शारीरिक शिक्षण विभाग) तसेच राज्य क्रीडा प्रशिक्षक अविनाश निंबार्ते आणि सरावासाठी मार्गदर्शन करणाऱ्या क्लबला दिले.
महाविद्यालयाचे संचालक मंडळ, प्राचार्य व सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015