logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सिलिंडरची साठेबाजी, दोन ठिकाणी धाडीत ३७ सिलिंडरचा साठा जप्त जिल्हा पुरवठा विभागाची कारवाही अनेकांचे धाबे दणाणले

सिलिंडरची साठेबाजी, दोन ठिकाणी धाडीत ३७ सिलिंडरचा साठा जप्त
जिल्हा पुरवठा विभागाची कारवाही अनेकांचे धाबे दणाणले

विलास केजरकर भंडारा.

भंडारा :- जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवार एका विशेष मोहिमेअंतर्गत भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील एका दुकान मालकावर व दवडीपार येथील सीएससी केंद्रावर धाड टाकून ३७ बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई जिल्हा पुरवठा विभागाने गुप्त माहितीच्या आधारे केली. यामुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा पुरवठा विभागाने पहिली कारवाई भंडारा शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील दुकान मालक नरेश श्रावण माकडे यांच्यावर केली आहे. या ठिकाणी एचपीसीएल कंपनीचे ४ घरगुती गॅस सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळले. नरेश माकडे यांच्याकडे सिलिंडरबाबत कोणतेही वैध कागदपत्रे किंवा खरेदी पावती उपलब्ध नाही. प्रशासनाने हे चारही सिलिंडर घटनास्थळावरून जप्त केले. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.
दुसरी कारवाई दवडीपार येथील सीएससी केंद्रावर करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या केंद्राची तपासणी केली असता, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संदेश विलास रामटेके आणि मंगेश विलास रामटेके हे एकाच ठिकाणाहून दोनं स्वतंत्र सीएससी केंद्र चालवत होते. तपासणीत या ठिकाणी एकूण ३३ गॅस सिलेंडर आढळून आले. यात एचपीसीएल कंपनीचे १४ सिलिंडर (१ भरलेलो, १३ रिकामे), इंडेन कंपनीचे १९ सिलेंडर (रिकामे) यांचा समावेश आहे.
ग्राहकांचे पासबूक, साठवणूक परवान्याचा आढळला अभाव तपासणीदरम्यान संबंधित सीएससी केंद्र चालकांकडे ग्राहकांचे घरगुती गॅस वितरणाबाबतचे कोणतेही पासबुक आढळून तसेच साठवणुकीचा कोणताही परवाना मिळून आला नाही. ग्राहकांचे सिलिंडर असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकृत मर्यादेपेक्षा जास्त साठा असल्याने हे सर्व सिलिंडर जप्त करण्यात आले.
दोन्ही प्रकरणांत ज्वलनशील पदार्थाचा बेकायदेशीर साठा करणे धोकादायक असल्याचे दिसून आले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
99 views

Comment