logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे महामार्गावर बसला आग नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग बस चालकाचे प्रसंगावधान; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग
बस चालकाचे प्रसंगावधान; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
सोलापूरहून नाशिककडे येणाऱ्या राज्य महामंडळाच्या बसला नाशिक- पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्याजवळ अचानक आग लागल्याने बस पूर्ण पणे जळून खाक झाली,दरम्यान बस चालकाने प्रसंग ओळखत बस थांबवल्याने प्रवासी सुखरूप बचावले आहे
दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढलेली असताना ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दि,13 रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान सोलापूर मार्गे नाशिककडे येणारी महामंडळाची हिरकणी बस एम,एच,06 बी डब्ल्यू 1235 ही प्रवाशांना घेऊन येत असताना नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्यावर बस समोरील भागातून धूर निघत असताना वाहनचालक विलास रोकोचोले वाहक संदीप मोरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ टोलनाक्याचापुढे बस थांबवत बसधील सर्व प्रवाशांना बस खाली उतरवले.
दरम्यान काही क्षणातच बसने पेट घेतला उपस्थित नागरिकांनी प्रथम आग विझवण्याचा प्रयत्न केला,यावेळी भिकू पोरजे यांनी तत्काळ नाशिकरोड अग्निशामक विभागाला कळविले असता त्यांनी धाव घेत आग विझविली

11
279 views

Comment