logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आगरी-कोळी पुतळ्याचा अवमान; व्हिडिओ व्हायरल प्रकरणी दोन अल्पवयीन ताब्यात

आगरी-कोळी पुतळ्याचा अवमान; व्हिडिओ व्हायरल प्रकरणी दोन अल्पवयीन ताब्यात

प्रतिनिधी | रणजित मस्के

नवी मुंबई : वाशी परिसरातील जुहूगाव चौपाटी (मिनी सीशोर) येथे उभारण्यात आलेल्या आगरी-कोळी बांधव व महिलेच्या पुतळ्याचा अवमान करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर १०, वाशी येथील मिनी सीशोर परिसरात आगरी-कोळी समाजाचे प्रतीक असलेला पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची विटंबना करून त्याचा व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित करण्यात आल्याची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९८, २९९, ३०२, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मानखुर्द येथील लल्लुभाई कंपाऊंड परिसरातून संबंधित इन्स्टाग्राम आयडी वापरणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोघेही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनीच पुतळ्याचा अवमान करून व्हिडिओ तयार केल्याची कबुली दिली. या प्रकरणात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून दोघांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

#NaviMumbaiPolice #VashiPoliceStation #NaviMumbaiMunicipalCorporation #MaharashtraPolice
#aagrikoli

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
58 views

Comment