logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत दाखल

होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत दाखल

मुंबई : इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाला असतानाच सौदी अरेबियातून कच्च्या तेलाने भरलेले एक जहाज सुरक्षितपणे मुंबई बंदरात दाखल झाले आहे. लायबेरियाचा ध्वज असलेले ‘शेनलॉन्ग’ हे सुएझमॅक्स प्रकारचे तेलवाहू जहाज रास तनुरा बंदरातून सुमारे १ लाख ३५ हजार टन कच्चे तेल घेऊन भारताकडे रवाना झाले होते.

इराणकडून जहाजांवर हल्ल्याची शक्यता असल्याने या जहाजाने प्रवासादरम्यान त्याची सिग्नल प्रणाली (AIS) बंद ठेवली होती. मोठ्या खबरदारीने होर्मुझ सामुद्रधुनी पार करून हे जहाज अखेर मुंबई बंदरात पोहोचले, अशी माहिती मुंबई पोर्ट प्राधिकरणाने दिली. जहाजातील कच्चे तेल मुंबई डॉकवरून माहुल येथील रिफायनरीकडे पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होत असल्याने या मार्गावरील तणावामुळे जागतिक इंधन बाजारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

#MumbaiPort #CrudeOil #SaudiArabia #StraitOfHormuz #mumbai

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
66 views

Comment