कासार शिरसी येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य संरक्षक भिंतीची उंची वाढविण्याची मागणी
कासार शिरसी येथील श्रेणी नंबर एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा परिसर अत्यंत अस्वच्छ बनला असून इमारतीच्या चारही बाजूस आजूबाजूचे नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असतात यामुळे या इमारत परिसरास अक्षरशः उकिरड्याचे रूप प्राप्त झाले असून या ठिकाणी उपचारार्थ येणारे पशुपालक व पशुधनांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून येथील संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
कासार शिरशी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा परिसर अत्यंत घाणेरडा बनला आहे आजूबाजूचे नागरिक या भागात सर्रास कचरा टाकतात इतकेच नव्हे तर या भागात मेलेली कुत्री, डुकरे ,मांजरे आणून टाकली जातात त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असल्याचे सांगितले याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेंबळे यांनी अनेक वेळा येथील ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला कळविले असल्याचे त्यांनी सांगितले वरिष्ठांना कळवून सुद्धा याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने सध्या सर्वत्र नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे या इमारती भोवती जवळपास चार लाख रुपये खर्चून संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे मात्र त्या भिंतीची उंची कमी आहे या संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात यावी असे मागणी करण्यात येत आहे