logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१५ ला भंडारा येथे सर्वधर्मीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

१५ ला भंडारा येथे सर्वधर्मीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- उड्डान बहुउद्देशिय संस्था, भोजापूर (भंडारा) च्या वतीने रविवार दि. १५ मार्च २०२६ ला सकाळी १०.३० ते ४ वाजेपर्यंत सामाजिक न्याय भवन जि.प. चौक भंडारा येथे सर्वधर्मीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सर्जन डॉ. मधुकर रंगारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त सुर्यभानजी हुमणे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सहाय्य विभाग समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती आशा कवाडे, महिला संरक्षण अधिकारी शुभांगी कोल्हे, ॲड. अर्चनाताई नंदागवळी(गजभिये), डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त कार्तिक मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त महेन्द्र गोंडाणे, बालकलाकार कु. युविका अमृत साखरवाडे, कु. आरंका आदिनाथ सरादे, बौद्ध विहार समितीचे सिद्धार्थ गजभिये, इतर मागासवर्गीय संघटनेचे सदानंद इलमे, इतर मागासवर्गीय संघटना, गोपाल सेलोकर, अनुसुचित जमाती संघटनेचे अजाबराव चिचामे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यावेळी मोहिम कृषी अधिकारी सुमित वासनिक, जिल्हा कृषी अधिकारी कु. सायली शेलार, उपविभागीय कृषी अधिकारी कु. सोनाली अरविंद मेश्राम व भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कु प्राची चटप यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बौद्ध विहार समन्वय समिती, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा-भंडारा, अनुसुचीत जामाती संघटना, इतर मागासवर्गीय संघटना भंडारा, धम्म बचत गट, भोजापूर यांचा सहभाग राहणार आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी वर- वधु परिचय मेळावा व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नोंदणीकरिता सिद्धार्थ गजभिये, डॉ. प्रविण थुलकर, नितीन गजभिये, प्रियाताई शहारे, मंगला वाडीभस्मे इत्यादींनी केले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
210 views

Comment