अफूची शेती करणारा आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद...
अफूची शेती करणारा आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद...
नगर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,जिल्हा घटकामध्ये श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ लागवड व विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.
सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पो.नि.श्री.किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री,सेवन व अफु लागवड करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/अनंत सालगुडे व समीर अभंग,पोलीस अंमलदार दिपक घाटकर, विजय पवार,अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांना रवाना केले.
सदर पथक हे कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे परमेश्वर बन्सी घनवट,रा.चापडगाव ता. कर्जत हा त्याच्या शेतामध्ये शासनाने लागवडीस व उत्पादन घेण्यास प्रतिबंधीत असलेले अफु झाडाची लागवड करुन संवर्धन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ कर्जत पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/विजय झंजाड व पोलीस अंमलदार संजय सानप, किरण जाधव, सचिन थोरात यांचेसह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी वाहनाने निघुन चापडगाव शिवारातील शेती गट नं.13 ची माहिती काढुन शेती गट नं.13 मध्ये जावुन खात्री करता सदर शेतामध्ये एक इसम शेतामध्ये राखण करतांना दिसुन आला. तेव्हा त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव परमेश्वर बन्सी घनवट वय- 68 वर्षे रा. चापडगाव ता. कर्जत, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि/ विजय झंजाड यांनी ताब्यातील इसमाकडे शेती व शेतीतील पिकाबाबत विचारपुस करता त्याने सदरचे गवत हे अफु असुन ते साधारण दोन ते तीन महिन्यापुर्वी लावलेले आहे. तसेच सदर अफु गवतास पाणी व खते घालुन त्याची जोपासना करत असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील आरोपीचे शेतातुन 47,64,180/-रु कि.चे 238.239 किलो ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत अफुची झाडे असा एकुण 47,64,180/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/1566 शामसुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कर्जत पोलीस स्टेशन गु. र. नं. 93/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 15(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व श्री.प्रविणचंद लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015