logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दिनांक 08 मार्च 2026 रोजी नाशिक शहरामध्ये साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक पोलिसांचे आव्हान.

दिनांक 08 मार्च 2026 रोजी नाशिक शहरामध्ये साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
सदर बंदोबस्तामध्ये

04 पोलीस उपायुक्त (DCP)
06 सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP)
38 पोलीस निरीक्षक
94 सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक
2000 पोलीस अंमलदार
900 होमगार्ड
01 SRPF कंपनी
02 RCP पथक
14 ATC पथक
04 QRT पथक
10 गुन्हे शाखा पथक
05 विशेष शाखा पथक
48 दामिनी मार्शल

असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, शहरातील प्रमुख चौक, रहाड, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी सूचना :
1.दारू पिऊन वाहन चालवू नये.
2.जबरदस्तीने कोणालाही रंग लावू नये.
3.रासायनिक किंवा घातक रंगांचा वापर टाळावा.
4.वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.
5.फुगे फेकून मारू नये.
6.कोणतीही अनुचित घटना आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

नागरिकांनी रंगपंचमी उत्सव आनंदात, शांततेत व सुरक्षितपणे साजरा करावा तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मा. श्री. संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी केले आहे..

0
99 views

Comment