logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतीची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा पोकळ फसवी घोषणा



शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतीची कर्जमाफी
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा पोकळ फसवी घोषणा

राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी नाही.त्यांचा सातबारा कोरा झालेला नाही.शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा पोकळ फसवी घोषणा अटी शर्ती च्या नावाखाली दोन लाखाची कर्जमाफी ही केवळ गाजर दिल्यासारखी शेतकऱ्यांचा थट्टा करणारा अर्थसंकल्प आहे संपूर्ण कर्जमाफी करणार असे खोटे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते,सातबारा कोरा करणार होते तो केवळ खोटी घोषणा होती का.?.शेतकऱ्यांना मोठी आशा होती की हे सरकार कर्जमाफी करेल कारण त्यांनी जाहीरनाम्यात कर्जमाफी करणार अशी घोषण केली होती.
राज्यभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या आत्महत्या सुरूच राहतील याला जबाबदार कोण.?. शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारा असा हा अर्थसंकल्प आहे.शेतकऱ्यांना वाचवण्याचा कोणताही अजेंडा यात राबवला नाही.
शेतकऱ्यांना अटी शर्ती लावून 2 लाखाच्या कर्जमाफीची जाहीर केलेली योजना ही केवळ थट्टा जखमेवर मीठ चोळण्याचा घोषणा आहे.संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या योजनेला अहिल्याबाई होळकरांचे नाव दिले असते तर शोभले असते.ज्या योजनेमुळे शेतकरी निराशच होणार आहे त्याला अहिल्याबाई होळकरांचे नाव देणे दुर्दैवी आहे.
सम्राट अशोक सेना या योजनेमुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला म्हणून बघत आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जीव घेतला महायुती सरकारने.कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.पश्चिम विदर्भात ७०७ तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.सत्तेसाठी ह्या सरकारने भोळ्या - भाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मते मिळवली.पण शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळालं काय तर खोटे आश्वासन.?.
अतिवृष्टी मुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. हातातलं पिकं गेलं,बँका कर्ज देत नाहीत.हतबल होऊन शेतकरी टोकाचं पाऊल उचलतोय.पण सरकारला काही देणंघेणं नाही.महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात,समाजात फुट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय. शेतकरी मेला,कुटुंब उद्ध्वस्त झालं तरी यांना लाज नाही. शेतकरी आत्महत्या साठी थेट जबाबदार कोणी असेल तर ते म्हणजे असंवेदनशील आणि विश्वास घातक महायुती सरकार पुन्हा एकदा अर्थसंकल्पाच्या पोकळ आश्वासनाने राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली.याचा आम्ही धिक्कार करतो.!!

*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट

*सातबारा कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र
फडणवीस धिक्कार असो.*
*महायुती सरकारचा धिक्कार असो*

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
88 views

Comment