logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

फाफोरे बु. येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ


फाफोरे बु. येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ

अमळनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या उपक्रमांतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” दि. ७ मार्च रोजी फाफोरे बु. (मंडळ – शिरूड, ता. अमळनेर) येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देत नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन मा. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा (अमळनेर) यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरीय शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. पुरवठा शाखेमार्फत 115 नवीन व दुबार शिधापत्रिका, संगायो शाखेमार्फत 147 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 22 हयात प्रमाणपत्रे, 21 नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच 7/12 दुरुस्ती – 51, वारस नोंदी – 11, फेरफार नोंदी निकाली – 7 करण्यात आल्या.

सेतु केंद्रामार्फत 212 उत्पन्न दाखले, 61 राष्ट्रीयत्व, 157 रहिवासी व 53 जातीचे दाखले वाटप, 10 आधार नोंदणी व 17 आधार दुरुस्ती करण्यात आली. बालविकास विभागाकडून 4 लाभार्थ्यांना बेबी कीट, तर कृषी विभागामार्फत 2 लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.

शिबिराच्या ठिकाणी विविध शासकीय विभागांची माहितीपर प्रदर्शने व सहाय्य कक्ष उभारण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 850 ते 900 नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.
यावेळी मा. खासदार स्मिताताई वाघ यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी मांडली, तर निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

1
46 views

Comment