logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लातूर : #तक्रारदारालाच गांधी चौक #पोलिसांची #धमकी; #खोटे गुन्हे #दाखल #करण्याचा #प्रयत्न? #पत्रकारांनाही अडवण्याचा केला #प्रयत्न !

लातूर : #तक्रारदारालाच गांधी चौक #पोलिसांची #धमकी; #खोटे गुन्हे #दाखल #करण्याचा #प्रयत्न?

#पत्रकारांनाही अडवण्याचा केला #प्रयत्न !

लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणालाच पोलिसांकडून धमकावण्यात आले असून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित पांडे हा तरुण काही तक्रारीसंदर्भात गांधी चौक पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांनी त्यालाच उलट धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यात आत नेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणात गांधी चौकचे पोलीस निरीक्षक रेचितवाड यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तक्रारदारालाच गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाच धमकी देण्याच्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

या प्रकरणाबाबत गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. आजची ताजी बातमी आजपर्यंत बरेच काही गुन्हे झाले गांधी चौक चे पीआय रीचित वाढ हे सुद्धा गुन्हेगारी मध्ये आणि त्यांच्या सहकार्यांमध्ये बनेवाडी मध्ये त्यांचा खूप मोठा हात दिसतो फक्त सामान्य नागरिकाला लुटणे आणि मोठ्या लोकांचे तळवे चाटणे हा त्यांचा फक्त हेतू दिसतोय एस पी चा जीआर सुद्धा त्यांना मान्य नाही म्हणजे एस पी च्या सुद्धा वरची लेवल यांची आहे एस पी च्या मान्य करायला हे नाकारत आहेत काल-परवाच झालेल्या एमआयडीसी येथील कर्तव्यदक्ष अधिकारी पीआय चौरे हे चांगल्या भवऱ्यामध्ये अडकले आहेत यांचा माजरीपणा किती दिवस सामान्य नागरिकांनी सहन करायचा हे ऐकत नाहीत म्हणजे गरीब जनता यांची काय गुलाम आहे का पोलिसांची एकीकडे लातूरमध्ये गुन्हेगारी प्रकरण वाढत आहेत आणि दुसरीकडे पोलीस 100-100 साठी रस्त्यावर गरीब जनतेला लुटत आहेत बाकी नागरिकांनी न्याय मागत होते आणि रोज उठून एसपीला निवेदन देणे हेही शक्य नाही असे जनतेतून कळवले जात आहे
आज जरी सध्या विचार केला तर प्रत्येक सिग्नल वरती एकही पोलीस दिसत नाही मात्र सिग्नलच्या बाजूला एक 100 200 मीटरवर दहा पाच ट्राफिक वाले आढळून येतात आणि त्यांच्यासोबत प्रायव्हेट माणसं सिव्हिल मध्ये दिसतात फक्त पैसे घेण्यासाठी पोलिसांना लगाम घालण्यासाठी गृहमंत्र्याकडे मागणी जनता करत आहे

1
135 views

Comment