logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शहापूर पोलिसांची कारवाई : एमडी अंमली पदार्थासह ₹३०,२२,७५० किमतीचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी / प्रतिनिधी – तुषार पोवार

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत पोलिसांनी एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थासह सुमारे ₹३०,२२,७५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ६ मार्च २०२६ रोजी करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मनीष रामविलास नागोरि (वय ३६, रा. प्रियदर्शिन हाऊसिंग सोसायटी, यड्राव, ता. शिरोळ) याच्या ताब्यातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आरोपीकडून सुमारे ६६५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ मिळून आला असून त्याची किंमत ₹२५,१५,००० इतकी आहे.

याशिवाय आरोपीकडून टीव्ही, HIKVISION कंपनीचा डीव्हीआर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मोबाईल फोन, गुटखा तसेच इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹३०,२२,७५० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर,सहायक फौजदार बबन माळी,सहायक फौजदार मुंगसे,पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद भांगरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वाती झुगर व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

23
734 views

Comment