logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बहुजन समाज पक्षाची नांदेड महानगर कार्यकारिणी जाहिर

बहुजन समाज पक्षाची नांदेड
महानगर कार्यकारिणी जाहिर

नांदेड (प्रतिनिधी)

गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी बहुजन समाज पक्षाची नांदेड येथे महत्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी नांदेड महानगर पुरुष व महिला कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
संघटन अधिक भक्कम करण्यासाठी, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी राजकीय वाटचाली संदर्भात या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली तसेच जिल्हानिहाय दौर्‍यांची घोषणा करण्यात आली.
हदगाव, भोकर, देगलूर, मुखेड, नायगाव, लोहा, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या दौर्‍यांद्वारे पक्षाचे विचार घराघरात पोहोचविणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे हा मुख्य उद्देश राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस पुढील मान्यवरांची उपस्थिती लाभली. राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रदेश सचिव वंदना गव्हाणे, मराठवाडा प्रभारी मनीषभाऊ कावळे, जिल्हा प्रभारी लोकेश कांबळे, लक्ष्मण वायवळे, सटवाजी सोनकांबळे, शिवाजी सोनटक्के, धम्मपाल गच्चे, जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे, जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम इगोले.

*नांदेड महानगर कार्यकारिणी*
बैठकीत बसपाची नांदेड महानगर कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे नियुक्ती जाहीर करण्यात आली. महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर, महानगर उपाध्यक्ष गोविंद वाघमारे, महानगर महासचिव महेश गायकवाड, महानगर सचिव स्वप्निल कापसे, महानगर कोषाध्यक्ष नारायण घुले.
तसेच नांदेड शहर महिला कार्यकारिणीची घोषणाही यावेळी करण्यात आली. जिल्हा प्रभारी छायाबाई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष
चंद्रकलाबाई ढगे आणि नांदेड शहर अध्यक्षपदी मंगलताई निलंगे यांची निवड करण्यात आली.

*महान विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार !*
बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीराम साहेब आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मायावती यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या महान विचारांना पुढे नेण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर चालत वंचित, शोषित आणि पीडित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच बहुजन समाजाच्या हक्कांसाठी पक्ष अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मनिषभाऊ कावळे, सुभाष भोकरे यांनी मार्गदर्शन केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

12
548 views

Comment