logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड : *शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत .


नांदेड : *शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमींना अंतिम सामन्याचा थरार एकत्र अनुभवता यावा यासाठी भाजप नांदेड महानगरतर्फे रविवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्यात येणार असल्याची माहिती महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर व जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.*

प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची असते. मात्र वेळेअभावी तसेच प्रचंड तिकीट दरांमुळे अनेकांना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहणे शक्य होत नाही. अशा वेळी भरगच्च सभागृहात मोठ्या पडद्यावर सामना पाहताना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासारखाच थरार आणि उत्साह अनुभवायला मिळतो. याच उद्देशाने नांदेडमधील क्रीडारसिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व ॲड. चैतन्यबापू देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे तसेच ॲड. किशोर देशमुख,महापौर कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत,सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे,डॉ. सचिन उमरेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

यंदाच्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीत इंग्लंडवर मात केली आणि अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे २० षटकांच्या विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कोणताही यजमान संघ अंतिम फेरीत पोहोचला नव्हता. भारतीय संघाने ही ऐतिहासिक कामगिरी करत देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची आणि यजमान संघ म्हणून विश्वचषक जिंकण्याची संधी प्रथमच भारताला मिळत असल्यामुळे अंतिम सामन्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

क्रिकेटप्रेमींना एकत्र येऊन या सामन्याचा आनंद लुटता यावा, यासाठी मोठ्या पडद्यावर सामन्याचे प्रक्षेपण करण्याची परंपरा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे. १९९५ पासून ट्वेंटी-२० तसेच ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धांतील सामने शहरात मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा उपक्रम त्यांनी सातत्याने राबविला असून मोठ्या पडद्यावर सामना दाखवण्याची ही १८ वी वेळ ठरणार आहे. भारताच्या विजयाच्या वेळी क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त जल्लोष आणि देशभक्तीचा माहोल निर्माण होणे ही या कार्यक्रमाची खासियत ठरते.

रविवारी होणाऱ्या या रोमांचक अंतिम सामन्याचे प्रक्षेपण यशस्वी करण्यासाठी सुरेश लोट, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, संतोष भारती, राजेशसिंह ठाकूर, सुरेश निलावार, जगतसिंग ठाकूर व शिवा लोट हे परिश्रम घेत आहेत. कुसुम सभागृहात मर्यादित आसनव्यवस्था असल्याने जे प्रथम येतील त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

भारताच्या विजयी अभियानाचा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी नांदेड शहरातील क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने वेळेवर कुसुम सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार अमरनाथ राजूरकर व धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
---------
(शीर्षक )

1. उद्या कुसुम सभागृहात क्रिकेटचा महासंग्राम : अमरनाथ राजूरकर-दिलीप ठाकूर यांचा उपक्रम
2. उद्या कुसुम सभागृहात विश्वचषक अंतिम सामन्याचा थरार : अमरनाथ राजूरकर, दिलीप ठाकूर पुढाकार
3. उद्या कुसुम सभागृहात भारत-न्यूझीलंड अंतिम सामना मोठ्या पडद्यावर : अमरनाथ राजूरकर, दिलीप ठाकूर यांची माहिती
4. उद्या कुसुम सभागृहात क्रिकेटप्रेमींसाठी जल्लोषाची संधी : अमरनाथ राजूरकर-दिलीप ठाकूर आयोजन
5. उद्या कुसुम सभागृहात क्रिकेटचा उत्सव : अमरनाथ राजूरकर व दिलीप ठाकूर यांचे आवाहन
6. उद्या कुसुम सभागृहात अंतिम सामन्याचा रोमांच : अमरनाथ राजूरकर-दिलीप ठाकूर पुढाकार
7. उद्या कुसुम सभागृहात भारत-न्यूझीलंड अंतिम लढत मोठ्या पडद्यावर : अमरनाथ राजूरकर, दिलीप ठाकूर
8. उद्या कुसुम सभागृहात क्रिकेटप्रेमींची मेजवानी : अमरनाथ राजूरकर-दिलीप ठाकूर यांचा विशेष उपक्रम
9. उद्या कुसुम सभागृहात विश्वचषक अंतिम सामन्याचा जल्लोष : अमरनाथ राजूरकर, दिलीप ठाकूर यांचे आयोजन
10. उद्या कुसुम सभागृहात अंतिम सामन्याचा थरार अनुभवता येणार : अमरनाथ राजूरकर-दिलीप ठाकूर

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
25 views

Comment