logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

घणसोलीत मनसेच्या 'मोफत महिला ऑटो रिक्षा प्रशिक्षण' उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

​नवी मुंबई (प्रतिनिधी):
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या वतीने आयोजित 'मोफत ऑटो रिक्षा प्रशिक्षण' नोंदणी सोहळा घणसोली येथे उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी नवी मुंबईतील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
​या कार्यक्रमाला महाराष्ट्र सैनिक विशाल साबळे, सचिन साळवे आणि कोपरखैरणे येथील संगीता मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आत्मनिर्भरतेचा मंत्र देण्यात आला.
​महिला सक्षमीकरणाचे प्रभावी पाऊल:
केवळ चूल आणि मूल या पलीकडे जाऊन महिलांनी वाहतूक क्षेत्रातही आपले कसब दाखवावे, या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. श्री. दत्तात्रय काळे साहेब (चिटणीस: ऐरोली विधानसभा) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात महिलांना प्रशिक्षणासोबतच तांत्रिक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
​प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या सुविधा:
​मोफत ट्रेनिंग: तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून रिक्षा चालवण्याचे संपूर्ण ज्ञान दिले जाईल.
​लायसन्ससाठी मदत: ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅज मिळवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
​नाव नोंदणी: इच्छुकांनी पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वीज बिल या कागदपत्रांसह नोंदणी करावी.
​हा कार्यक्रम घणसोली येथील साईबाबा मंदिर, सेक्टर १६ येथे पार पडला. या मोहिमेमुळे गरजू महिलांना रोजगाराची नवी दिशा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक महिला ८०८००७६२६२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

25
987 views

Comment