युद्धाची स्थिती पाहता अबू धाबीतील भारतीय दुतावास आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी हे सातत्याने भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे
*CMO Maharashtra Tweets:*
युद्धाची स्थिती पाहता अबू धाबीतील भारतीय दुतावास आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी हे सातत्याने अबू धाबी व दुबईतील महाराष्ट्राच्या तसेच भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहेत.
भारतीय नागरिकांसोबत झालेल्या चर्चेनुसार, दुतावासाने सांगितले की केंद्र सरकार व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. भारतीय नागरिकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, केंद्र सरकार संपूर्ण सहाय्य करेल. महाराष्ट्रातील जे लोक तेथे अडकले आहेत, त्यांनी अबू धाबीतील भारतीय दुतावास (@IndembAbuDhabi) आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया (@cgidubai) यांच्या अधिकृत एक्स खात्यावरील अपटेड पहावेत. महाराष्ट्रातील नागरिक हे सोबत जोडलेल्या ई-मेल आणि हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुबईतील इंडियन पीपल्स फोरमशी संपर्कात आहेत. शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी एक व्हॉटसअॅप क्रमांक जारी केला आहे.
व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357 (कृपया या क्रमांकावर केवळ मेसेज करायचा आहे)
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015