logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही; संबंधित विभागाकडून दिरंगाई?


मुरुड जंजिरा (साकिब गजगे ):
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग (महसूल व वन विभाग) यांच्याकडून दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरुड यांना लेखी आदेश देण्यात आले होते. हे पत्र श्री. साकीब मुस्ताक गंजे (मु.पो. आरगावंद, ता. मुरुड, जि. रायगड) यांनी सादर केलेल्या अर्जाच्या संदर्भात पाठविण्यात आले होते.

सदर पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक अभिलेखांची पडताळणी करावी. तसेच शासन नियम, अधिनियम व तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करून तातडीने अहवाल सादर करावा. प्रकरण विनाकारण प्रलंबित ठेवू नये, अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या.

मात्र, पत्र पाठवून अनेक दिवस उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे समोर येत आहे. ना अर्जदाराला अधिकृत प्रतिसाद देण्यात आला आहे, ना तपासणीचा अहवाल सादर झाल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट आदेश देण्यात आल्यानंतरही जर संबंधित विभागाने दखल घेतली नाही, तर हे गंभीर प्रशासकीय दुर्लक्ष मानले जावे. अशा प्रकारच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होतात, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे, चौकशी कोणत्या टप्प्यावर आहे आणि अहवाल का सादर करण्यात आलेला नाही, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही या प्रकरणाचा पाठपुरावा करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून नियमांनुसार योग्य कारवाई करावी व अर्जदाराला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

8
473 views

Comment