नेवाश्यात 02 आरोपीकडुन 02 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसे हस्तगत...
नेवाश्यात 02 आरोपीकडुन 02 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसे हस्तगत...
नेवासा/श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 28/02/2026 रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा हा चारचाकी वाहनातुन गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी वांजोळी शिवारात सापळा लावला थांबले असता. वांजोळीकडुन एमआयड़ीसीकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. तेव्हा पथकाने चारचाकी वाहन थांबविले असता. तेव्हा गाडीतील चालक वाहन थांबवुन पळुन जावुन लागला तेव्हा पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट वय- 34 वर्षे रा. मोरेचिंचोरे ता.नेवसा जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), 1000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, 5,00,000/-रु कि.चे मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण 5,31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी नामे नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट याचेविरुध्द यापुर्वी ०९ गुन्हे दाखल आहेत
ताब्यातील इसमाविरुध्द पोहेकॉ/437 सोमनाथ आसमानराव झांबरे,नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 78/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. तसेच वरील नमुद पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा चारचाकी वाहनातुन गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी घोडेगाव शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी घोडेगाव शिवारात सापळा लावला थांबले असता. राजेगावकडुन घोडेगावकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. तेव्हा पथकाने चारचाकी वाहन थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख वय-31 वर्षे रा. कृष्णानगर झोपडपट्टी,घोडेगाव ता. नेवासा असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र),1000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, 4,00,000/-रु कि.ची मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण 4,31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख याचेविरुध्द यापुर्वी तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत.ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाठ नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 79/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील प्रमाणे सोनई पोलीस स्टेशन हद्दीत दोन आरोपीविरुध्द कारवाई करुन त्यांचेकडुन 02 गावठ्ठी कट्टे व 04 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, व श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015