logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धाडसी सारिका शेंडे ( दुपारे ) ठरल्या देवदूत; भीषण आगीतून 6-8 महिलांचे प्राण वाचवले..


काटोल (प्रतिनिधी) – राउळगाव येथील घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत एका तरुणीने दाखवलेले अद्वितीय धैर्य आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एसबीएल कंपनीमध्ये ऑपरेटर पदावर कार्यरत असलेल्या सारिका शेंडे ( दुपारे ) यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सहा ते आठ हून अधिक महिला मजुरांचे प्राण वाचवले.
सकाळच्या सुमारास अचानक झालेल्या प्रचंड स्फोटाने परिसर हादरला. शेजारच्या प्लांटमध्ये काम करत असलेल्या सारिका यांनी आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर चारही बाजूंनी उसळणाऱ्या ज्वाळा, दाट धूर आणि मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या महिला मजुरांचे भयावह दृश्य त्यांनी पाहिले.
परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही त्यांनी धैर्य गमावले नाही. आगीच्या लाटांमधून आणि धुराच्या ढगांमधून मार्ग काढत त्यांनी एकामागून एक महिलांना सुरक्षित बाहेर आणले. त्यांच्या प्रसंगावधान आणि जिद्दीमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “आग भीषण होती, आत जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. पण सारिका निर्भयपणे आत गेल्या आणि महिलांना बाहेर काढले. त्या खऱ्या अर्थाने देवदूत ठरल्या.”
सारिका शेंडे ( दुपारे ) यांच्या या शौर्यपूर्ण कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांना सन्मानित करण्याची मागणी जोर धरत आहे. संकटसमयी दाखवलेले त्यांचे धैर्य समाजासाठी आदर्श ठरत आहे.

78
3358 views

Comment